Ad will apear here
Next
स्टारफिश स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंची विशेष कामगिरी
पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुल येथे पार पडलेल्यास बायथले व ट्रायथले स्पर्धेत पदक पटकावलेले स्टारफिश स्पोर्टस् क्लबचे जलतरणपटू.ठाणे : पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडासंकुलात नुकत्याच बायथले, ट्रायथले स्पर्धा पार पडल्या. तसेच सांगली येथे ४४वी ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण व वॉटरपोलो स्पर्धा पार पडल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुण्यातील स्पर्धांचे निकाल :
बायथल प्रकारात आदित्य घाग व नील वैद्य यांनी सुवर्णपदक, तसेच बेस्ट अॅथलीट चॅम्पिनयनशिप पारितोषिक पटकाविले. मिहिका सुर्वे हिने रौप्यपदक पटकावले, तर वेदान्त गोखले याने बायथले प्रकारात कांस्यपदक व ट्रायथले प्रकारात रौप्यपदक पटकावले. ‘यंगेस्ट स्विमर’ म्हणून मीर वीरा याला रायगड जिल्हा मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी विशेष पारितोषिक देऊन गौरविले.

आठ वर्षांखालील वयोगटात सर्वांत लहान अॅथलीट वरद कोळी, प्राश्मी गाला, आयुषी आखाडे यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनीश चव्हाण, सोहम साळुंखे, सर्वेश डोके, आर्यन डोके, ईशा शिंदे, मानव मोरे यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ट्रायथले प्रकारात मानव मोरे यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

सांगली येथे झालेल्या ४४व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण व वॉटरपोलो स्पर्धेत पदक पटकावलेले स्टारफिश स्पोर्टस् क्लबचे जलतरणपटू.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आशियाई मॉडर्न पेंटॉथलॉनचे सेक्रेटरी, तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य नामदेव शिरगावकर व ‘मॉडर्न पेंटाथलॉन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे उपस्थित होते.


सांगलीतील स्पर्धांचे निकाल :

जलतरण स्पर्धेत सानिका तापकीर हिने एक सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदके, सानिका नवरे हिने सहा रौप्य व एक कांस्य, तर नील वैद्य याने दोन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. वॉटरपोलो स्पर्धेत जय एकबोटे याच्या नेतृत्वाखाली स्टारफिश स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंनी रौप्यपदक पटकावले. ऋतुजा पोळ हिच्या नेतृत्वाखाली मुलींनीही बाजी मारून रौप्यपदक पटकावले. वरील दोन्ही स्पर्धांसाठी कैलास आखाडे, नरेंद्र पवार, मनोज कांबळे यांच्या मागदर्शनाखाली जलतरणपटूंनी सराव केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZETBD
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
पुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुणे : सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. त्या वेळी अवघ्या महाराष्ट्राने आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी खाण्याच्या वस्तू, धान्य, कपडे, औषधे अशा विविध प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला. पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन थोडा
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पुणे : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language